.......................
कारंजात आढळला केवळ एक रुग्ण
वाशिम : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण कारंजा तालुक्यात आढळले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून १७ जून रोजी केवळ एक बाधित रुग्ण आढळला.
......................
साप दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
वाशिम : सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील पाऊस झाला आहे. यामुळे विविध प्रजातींचे साप आढळत असून त्यांना जीवे न मारता आपणास संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र मो. समीर यांनी केले आहे.
................
रुग्णसंख्या घटल्याने अधिकांश बेड रिक्त
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी ओसरले आहे. रुग्णसंख्येतही परिणामकारक घट झाली असून खासगी रुग्णालयांमधील अधिकांश बेड रिक्त झाल्याचे दिसून येत आहे.