...............
साडेपाच किलोमीटरचे कालवे झाले रद्द
वाशिम : मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून, उपसा पद्धतीने सिंचनाच्या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय रोखणे शक्य होणार आहे.
.....................
आधार केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : आधार कार्डात त्रुटी असल्यास ते अपडेट करावे लागते. त्यानुषंगाने आधार अपडेट केंद्र तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.
............
बॉटलमध्ये पेट्रोल दिल्यास कारवाई
वाशिम : काही दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न एका इसमाने केला होता. या पृष्ठभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर, शहरातील पेट्रोलपंपांनी बॉटलमध्ये पेट्रोल देणे बंद केल्याचे दिसत आहे.