..............
रस्ता सुरक्षेची युद्धस्तरावर जनजागृती
जऊळका रेल्वे : १८ जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची चोख अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत जऊळका ते मालेगाव रस्त्यावर शुक्रवारी वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात आली.
................
‘एफडीए’मधील रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. याकडे लक्ष पुरवून ही पदे भरण्यात यावी, अशी मागणी मोरया ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
.......................
जुने शहरात रात्रगस्त वाढविण्याची मागणी
वाशिम : जुने शहरातील शुक्रवारपेठ भागात रात्रीच्या सुमारास भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी सचिन आळणे यांनी पोलीस प्रशासनाकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
................
जिल्हा रुग्णालयातील फिल्टर निरुपयोगी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. रुग्णालयातील वॉटर फिल्टरही निरुपयोगी ठरले असून, ते दुरुस्त करण्याची मागणी मनिष चहारे यांनी बुधवारी केली.
.................
कलापथकातील कलावंतांकडून कोरोनाविषयी जनजागृती
मेडशी : जिल्हा माहिती कार्यालयाअंतर्गत येथे रामचंद्र बहुउद्देशीय कला व जनजागृती कला, सांस्कृतिक संस्थेच्या कलावंतांनी ४ फेब्रुवारी रोजी कोरोनाविषयी जनजागृती केली. यावेळी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
....................
बस स्थानकात रॅम्प उभारण्याची मागणी
वाशिम : वाशिम येथील एसटी आगारात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सोयीसाठी रॅम्प उभारण्यात आलेले नाही. ही व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी दिव्यांग बेबीताई कांबळे यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.