शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

तलाठी व मंडळ अधिका-यांनी दिले सामूहिक रजेचे अर्ज !

By admin | Published: November 18, 2016 2:22 AM

मालेगाव तहसील अधिकारी यांच्याकडे केले अर्ज सादर.

मालेगाव, दि. १७- तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या मान्य न झाल्याने १७ नोव्हेंबरपासून सर्व जण सामूहिक रजेवर गेले आहेत. तहसीलदारांना सामूहिक रजेचे अर्ज दिले आहेत. प्रलंबित असलेल्या विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे निवेदन दिले. मालेगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. याचवेळी मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाला सुरुवात केली. ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान काळ्या फिती लावून तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी आंदोलन केले. तलाठी साजा व महसूल मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, संगणीकृत सात बारामधील वेबसाइटच्या कनेक्टिव्हिटीची अडचण दूर करावी, प्रत्येकाला लॅपटॉप व प्रिंटर देण्यात यावे, पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिजबाबत निश्‍चित धोरण ठरविण्यात यावे, प्रत्येक गावात कार्यालयाची सोय करावी, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धत वापरावी, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे. १७ नोव्हेंबरपासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. मालेगाव तहसील येथील ४४ तलाठी व ८ मंडळ अधिकारी आंदोलनात सहभाग झाले आहेत.