लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले की, जिल्हयासह महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रात मोडणारे शेतमजुर, हमाल, फेरीवाला, वृत्तपत्र विक्री करणारे, यंत्रमाग, विडी, हॉटेल, भाजीपाला व फळांची विक्री करणारा, रिक्षावाला टांगेवाला, बांधकाम कामगार, घरगुती, धुणेभांडी, मोलमजुरी, छपाई कामगार, पेंटरकाम, चहावाला, दुधवाला, थिएटर कामगार, भाजीपाला विक्रेत्यांबाबत मालकांकडून कामगार कायद्याचे पालन होत नाही. त्यामुळे या सर्व असंघटीत कामगार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे २१ जून २0१७ पासून सोलापूर ते संपूर्ण महाराष्ट्रभर असंघटीत कष्टकरी कामगारांना कर्जमाफी द्या आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार बचाव संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व कामगारांची कर्जमाफी करणे, शेतमजूरांना कामगार कायदे लागु करणे, कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करणे, कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतन लागु करणे, त्यांना भविष्यनिर्वाह निधी देणे, विमा कायदा लागु करणे, अपघाती विमा लागु करणे, कामगारांसाठी शैक्षणिक, आर्थिक व आरोग्यविषयक योजना राबविणे, त्यांना मोफत बस प्रवास पास देणे व कामगारांना विनाव्याज बँकेकडून कर्ज देणे आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, बाजार समिती उपसभापती सुरेश मापारी, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष गजाननराव देशमुख, बंडु शिंदे, विठ्ठल चौधरी आदिंची उपस्थिती होती.
शेतमजुरांना कामगार कायदा लागू करून कर्जमुक्त करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:23 AM
वाशिम: शेतमजूरांना कामगार कायदा लागू करुन त्यांची कर्जमुक्ती करण्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार संघटनाजिल्हाधिकार्यांना निवेदन