लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर सनियंत्रण समितीही स्थापन करण्यात आली. दुसरीकडे बदली झालेल्या काही सहायक पोलीस निरीक्षकांवरही तत्कालिन पोलीस स्टेशनची जबाबदारी सोपविण्यात आल्याने या नियुक्ती प्रक्रियेत त्रूट्या असल्याचे दिसून येते.ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती तसेच १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड, वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, वाशिम ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, रिसोडचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, अनसिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बनसोड, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंपणे, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, मानोराचे पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसरे या पोलीस अधिकाº्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक भारद्वाज यांची बदली झाली असून, त्यांच्याकडेच वाशिम ग्रामीणची जबाबदारी कायम ठेवली आहे. आसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संजय शिपणे यांचीदेखील आसेगाव येथून बदली झाली आहे. त्यांच्याकडे आसेगाव येथीलच जबाबदारी असल्याचे ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकाºयांची यादीत नमूद आहे.जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण असून गृह शाखेचे पोलीस उप अधीक्षक यशवंत केडगे हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस, संदेश पाठवू शकतात.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 3:49 PM