मालेगाव : येथील तालुका sd समितीची सभा २९ मार्च रोजी पार पडली. यामध्ये विविध योजनांसाठी सादर करण्यात आलेल्या २९२ प्रस्तावांपैकी १८९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यातील ४३ प्रस्तावांत त्रुटी आढळल्या, तर ४८ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आली आणि २ लाभार्थी उपस्थित राहिले नसल्याने त्यावर निर्णयच होऊ शकला नाही, अशी माहिती निराधार समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे यांनी ३० मार्च रोजी दिली.
गोरगरीब वृद्ध, निराधार, दिव्यांगांसाठी शासनातर्फे विविध योजनांतर्गत दरमहा अनुदान दिले जाते. यासाठी सादर करण्यात येणाºया प्रस्तावांची पडताळणी करून संजय गांधी निराधार समितीतर्फे मंजुरी दिली जाते. या अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना आदिंचा समावेश आहे. यासाठी मालेगाव तालुक्यात विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकूण ७० प्रस्ताव लाभार्थींनी सादर केले होते. त्यामधील ६८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर २ लाभार्थी उपस्थित झाले नाहीत. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि श्रावण बाळ योजनेंतर्गत २१२ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४८ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले असून, ४३ प्रस्तावांत त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे यातील एकूण १२१ प्रस्तावांनाच मंजुरी मिळू शकली. ज्या लाभार्थींच्या अर्जांत त्रुटी आढळल्या, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावे, असे आवाहन निराधार योजना समितीच्यावतीने करण्यात आले आहे. या सभेला अध्यक्ष मारोतराव लादे, सदस्य अमोल माकोडे, संगिता राऊत, नितिन काळे, दिपक दहात्रे, संजय केकन, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ गजानन ढवळे आदिंसह व्ही. जर. मारवडी, एस. ए. ठोकळ, सी. बी. इंगोले आदि कर्मचारी उपस्तिथ होते.