वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विविध स्वरूपातील अडचणीत सापडलेल्या जमिनींचा अपवाद वगळता किमान ८० टक्के भुसंपादन येत्या ३१ मार्च २०१८ च्या आत करण्यात यावे, असे निर्देश शासनाने स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, अधिकारी, कर्मचारी जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यानुषंगाने तालुका उपनिबंधक कार्यालयांवर शेतकºयांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. दरम्यान, शेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देवून सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित करण्याचा निर्धार केल्याने शेतकºयांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती. आगामी सहा दिवसांत हे प्रमाण वाढवून ३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकामी जोमाने भिडल्याचे दिसून येत आहे.
३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के जमीन संपादित करा! -समृद्धी महामार्गाबाबत शासनाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:05 PM
वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या भुसंपादनाच्या कामास सद्या चांगलीच गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी एकंदरित ९८८.२५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.त्यामुळेच २६ मार्चपर्यंत भुसंपादनाची टक्केवारी ७० टक्क्यांच्या वर पोहचली होती.३१ मार्चपर्यंत किमान ८० टक्के भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश तालुका पातळीवर देण्यात आले आहेत.