शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

ऑनलाईन परीक्षेमुळे ‘मध्यस्थ’ आऊट

By admin | Published: January 12, 2015 1:46 AM

उपप्रादेशिक परिवहन विभागात उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाण ९२ टक्क्यांवरून ७६ टक्क्यांवर

संतोष वानखडे /वाशिम

वाहतुकीच्या नियमांची प्रत्यक्ष उजळणी करून घेणार्‍या ह्यऑनलाईनह्ण परीक्षेमुळे मध्यस्थांची लुडबुड व बोगस उमेदवारांच्या परवान्याला चाप बसला आहे. वाहतुकीचे नियम माहीत असणारे उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण होत असल्याने साहजिकच, पूर्वीच्या तुलनेत उत्तीर्ण उमेदवारांचा टक्काही घसरला आहे. ऑनलाईन परीक्षेपूर्वी उत्तीर्णतेचे असलेले ९२ टक्के प्रमाण आता ७६ टक्क्यांवर आले असल्याची साक्ष वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाची आकडेवारी देत आहे. वाहतुकीच्या नियमांची प्रत्यक्ष उजळणी करून घेणार्‍या ह्यऑनलाईनह्ण परीक्षेने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. साधारणत: वर्षभरापूर्वी शिकाऊ वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रिया सोपी होती. रहिवासी दाखला व ओळखीच्या प्रमाणपत्रासह अर्ज करणार्‍यांना परिवहन विभाग परवाना देऊन टाकत होते. अनेक वेळा तर परवाना मागणार्‍याला वाहतुकीच्या नियमांशी काही देणे-घेणेही नव्हते. यातूनच रस्ते अपघातांचा आलेख वाढत चालला होता. रस्ते अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून तसेच वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेपाला चाप बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २0१४-१५ पासून ऑनलाईन परीक्षा सुरू केली आहे. ऑनलाईन परीक्षेने लर्निंग लायसन्स प्रक्रियेमधील मानवी लुडबुडीला चाप लावला; सोबतच उमेदवारांना वाहतुकीच्या नियमांची जाणीवही करून देत आहे. ऑनलाईन नाव नोंदणीनंतर लर्निंस लायसन्ससाठी (शिकाऊ परवाना) सीसीटीव्हीच्या नजरेखाली परीक्षा घेतली जाते. ऑनलाईन परीक्षा पद्धतीत मानवी हस्तक्षेपाला प्रतिबंध असल्याने साहजिकच वाहतुकीच्या नियमांची उजळणी उमेदवारांना करावीच लागत आहे. वाहतुकीच्या नियमांना ठेंगा दाखविणारे उमेदवार आपसूकच ऑनलाईन परीक्षेतून बाद होत आहेत. ऑनलाईन परीक्षेपूर्वी लर्निंग लायसन्स मिळण्याचे शेकडा प्रमाण ९२ टक्के होते. आता हेच प्रमाण ७६ टक्क्यापर्यंत खाली आले आहे. २0१३-१४ मध्ये २२ हजार ८१८ पैकी २0 हजार ९९४ उमेदवारांना लर्निंंग लायसन्स मिळाले होते. ऑनलाईन परीक्षेनंतर ३२३२ पैकी २४६२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.