लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : येथे रविवारी क्षुल्लक कारणावरून चाकू व कुऱ्हाडीने दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल तक्रारींवरून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.सिकंदर अली जाफर अली याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले, की औषधी घेण्याकरिता मेडिकलवर जात असताना नईम खाँ. रहीम खाँ व कलीम खाँ रहीम खाँ यांनी रस्त्यात अडवून विनाकारण वाद घातला व चाकूने वार करून जखमी केले. त्यावरून दोघांविरुद्ध कलम ३०७, ५०४, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले; तर रहीम खाँ यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाकर अली गफ्फार अली, सिकंदर अली गफार अली, रमजान अली गफार अली, या तिघांवरही कलम ३२४, ४५२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन गटात सशस्त्र हाणामारी; पाच जणांवर गुन्हे दाखल
By admin | Published: July 10, 2017 2:06 AM