रिसोड : रिसोड तालुक्यातील देगाव येथील दोन घरांत सशस्त्र दरोडा टाकून ३.७८ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १० आॅगस्टच्या रात्रीदरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.देगाव येथील सुदर्शन ज्ञानबा लेंभाडे (२१) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, देगाव शेतशिवारात दत्त मंदिराचे बाजुला सुदर्शन लेंभाडे हे राहतात. त्यांचे वडील ज्ञानबा लेंभाडे हे मंदिराचे पुजारी असून, मंगळवारी सर्वजण जेवन करीत असताना, तोंडाला रुमाल बांधलेल्या सहा लोकांनी सशस्त्र घरात प्रवेश केला. यापैकी काही जणांनी ज्ञानबा लेंभाडे यांना मारहाण केल्याने घरातील इतर सदस्यही भयभीत झाले. घरातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मोबाईल व अन्य किंमती साहित्य काढून देण्याची धमकी देत दरोडेखोरांनी मारहाणही केली. सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण दोन लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला. मराठी व हिंदी भाषेत दरोडेखोर आपापसात बोलत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३९५ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार एस. एम. जाधव हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, दरोडेखोरांचा शोध घेण्यात यश आले नाही. फरार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. गायकवाड यांच्या घरातही चोरीसुदर्शन लेंभाडे यांच्या शेतालगत असणाºया गजानन महाराज मंदिराचे खोलीमध्ये राहणारे कुंडलीक गायकवाड यांचे घरीदेखील त्याच रात्रीदरम्यान चोरी झाली. त्यांचे घरातील सोन्याचे दागीने व रोख असा एकूण एक लाखाचा ऐवज लंपास केला.
देगाव येथे सशस्त्र दरोडा; ३.७८ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 4:28 PM