वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली असून, परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यामधील नव्वद टक्के सोयाबीनची सोंगणी आणि काढणीही उरकली असून, शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी घाई करीत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी एकट्या कारंजा बाजार समितीमध्ये १० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर त्या खालोखाल वाशिम बाजार समितीमध्ये ६ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकºयांनी आणले होते; परंतु जिल्ह्यातील सर्व बाजारातील दराची आकडेवारी तपासली असता या शेतमालास सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत, तर शासनाने यंदा या शेतमालास बोनससह ३०५० रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. याचा विचार केल्यास सध्या शेतकºयांकडून ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्हाभरात नाफेडमार्फ त सोयाबीनच्या खरेदीला सुरूवात करण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत केवळ मंगरुळपीर येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांसाठी नाफेडद्वारे खरेदीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, भाव पडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:00 PM
वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
ठळक मुद्देनाफेडद्वारे खरेदी सुरू करण्याची गरज