ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजनविदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चालोककलावंतांना मानधन देण्याची प्रमुख मागणी
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : लोककलावतांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२:३० वाजता विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंतांना राज्यसरकारचे मानधन पाच हजार व दहा हजार रुपये केंद्र सरकारकडून देण्यात यावे, कलावंतांना घरकुल मिळाले पाहिजे, एस.टी.रेल्वे प्रवास मोफत पास मिळाली पाहिजे. आदी विविध मागण्यांसाठी कारंजा तालुक्यातील सर्व लोककलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.