लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा, गट प्रवर्तक कर्मचाºयांनी ४ सप्टेंबरपासून कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे अंगणवाडी, आरोग्य केंद्रातील कामकाजात व्यत्यय निर्माण झाला.आशा स्वयंसेविकांना तसेच गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, शासकीय सेवेत सामावून घेत किमान अंगणवाडी सेविकांऐवढे मानधन द्यावे यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कृती समितीतर्फे शासनस्तरावर वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. तथापि याकडे शासनाने लक्ष दिले नाही. मध्यंतरी राज्य कृती समितीतर्फे २२ ते २७ जुलै या कालावधीत वैयक्तिक स्मरणपत्रेही दिले होते. त्याऊपरही शासनाने दखल न घेतल्याने राज्यभरातील आशा-गट प्रवर्तकांनी ३ सप्टेंबरपासून कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. वाशिम जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. कोणतीही माहिती शासनाला न देणे, कोणतेही शासकीय कामकाज न करणे असे या आंदोलनाचे स्वरुप आहे. ऐन राष्टÑीय पोषण महिना उपक्रमादरम्यानच आशा, गटप्रवर्तकांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. प्रलंबित मागण्यासंदर्भात ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला.
वाशिम जिल्ह्यात आशा, गटप्रवर्तकांचा कामकाजावर बहिष्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:26 PM