कोरोना संसर्गाच्या काळात आशा सेविकांनी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावावे, फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा, यासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती केली. प्रशासनाकडून सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडून गावात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी इमानेइतबारे सेवा दिली. त्यांच्या या कार्यतत्परतेचा गौरव व्हावा, या उद्देशाने मसलापेन येथील आरोग्य उपकेंद्रात ३१ मे रोजी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी त्यांना साडी-चोळी, भेटवस्तू व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी वाशिम जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष खुशालराव पाटील ढोणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नामदेवराव पाटील हुंबाड, अशोकराव सानप, तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी तहकिक, बदर महाराज यांच्यासह आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
साडी-चोळी देऊन आशा सेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:31 AM