लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : शेतजमिनीच्या धुºयावरील दगड का सरकवला या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ९ मे रोजी धामणी येथे घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी तीन आरोपींवर १० मे रोजी गुन्हा दाखल केला.पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, संतोष विश्वनाथ पवार (रा. सोमठाणा) हे धामणी शेतशिवारात असलेल्या त्यांच्या शेतीकडे जात असताना आरोपी तुकाराम धारपवार, मंगेश धारपवार, नागेश धारपवार यांनी रस्ता अडवून धुºयावरील दगड कोणी सरकविला, अशी विचारणा केली. त्यावर आपणास माहित नाही, असे उत्तर दिले असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व दोघांनी हात धरून एकाने विळ्याने छातीवर मारहाण केली. यामुळे छातीला खोलवर जखम झाली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलीसांनी नमूद तीनही आरोपींवर भादंविचे कलम ३४१, ३०७, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे करीत आहे. दरम्यान, १० मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींना अटक करण्यात आली. जखमीवर कारंजा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:47 PM