लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे तिर्थस्थळ विकास आराखड्यातील ‘थीम पार्क सेवा सागर’च्या कामांसाठी अभियंत्यांच्या चमूने २ आॅक्टोबरला पाहणी केली.बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून पोहरादेवी ओळखले जाते. येथे देशाच्या कानाकोपºयातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने येतात. तिर्थस्थळ विकास आराखड्यातून पोहरादेवी येथे विविध प्रकारची कामे प्रस्तावित आहेत. काही कामांना सुरूवात झाली तर काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पोहरादेवी येथे ‘थीम पार्क सेवा सागर’ लवकरच साकारणार आहे. या पार्कसाठी १६ कोटी रुपयांचा निधी असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यानुसार अभियंत्यांच्या चमूने पोहरादेवी येथे जागेची पाहणी केली. करण्यासाठी वाशिमचे कार्यकारी अभियंता जोशी, मंगरुळपिरचे उपविभागीय अभियंता नागे आणि मानोरा येथील सहायक अभियंता किनकर यांच्या शिष्टमंडळाने पाहणी करून कामाला लवकर सुरूवात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पोहरादेवीचे सरपंच प्रतिनिधी गजानन खंडारे, मोंटी राठोड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अविनाश राठोड, कुंडलिक राठोड, भिकू चव्हाण तर महंत कबीरदास महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.जागेची पाहणी करून अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने श्री सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते जोशी, नागे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 3:06 PM