१२ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शाळांना २० टक्के व अगोदरच २० टक्के अनुदान असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदानास पात्र ठरविण्यात आले. मात्र, यामध्येही बऱ्याच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा काही किरकोळ त्रुटी असल्यामुळे अपात्र ठरल्या होत्या. या अपात्र शाळांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने विभागीय स्तरावर सुनावण्या आयोजित केल्या होत्या. ११ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती येथे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अपात्र शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनादरम्यान आपल्या विभागाचे शिक्षक आ. ॲड. किरणराव सरनाईक हे पूर्णवेळ उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कोणत्याही शाळेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचित केले. विभागातील अनुदानास अपात्र शाळा अनुदानास पात्र कशा ठरतील, हा त्यांचा प्रयत्न होता. आता निश्चितच या अपात्र शाळांचा अनुदानाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळांचे मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:53 AM