लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रेतीची अवैध वाहतूक करणाºया एका ट्रॅक्टरला पकडल्यानंतर, सदर ट्रॅक्टरचालकाने रिसोड तहसिलदार अजित शेलार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा तसेच त्यानंतर धक्काबुक्की केल्याची घटना २२ मे रोजी रात्री ११.३० वाजतादरम्यान गोभणी शेतशिवारात घडली. याप्रकरणी संतोष अशोक कुºहे रा. नेतन्सा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पैनगंगा नदी पात्रातील विविध घाटावरून रेतीचा अवैध उपसा रात्रीच्या सुमारास मोठया प्रमाणात होत आहे. याप्रकरणी तहसीलदार शेलार यांनी तालुक्यातील विविध रेती घाटावर धाड टाकण्याचे सत्र सुरू केली. दरम्यान शुक्रवार २२ मे च्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गोभणी घाटावर तहसीलदार शेलार यांनी तलाठी स्वप्नील धांडे व इतर कर्मचाº्यांसमवेत धाड टाकली. यावेळी ट्रॅक्टरधारकांनी पळ काढला. यात एका ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्यास घाटाच्या काही अंतरावर पकडण्यात आले. ट्रॅक्टर चालक संतोष कुºहे यास पकडून ट्रॅक्टरसह रिसोड पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले असता शेलार व कुºहे यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. हुज्जत घालत कुºहे याने तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला तसेच तहसिलदारासह कर्मचाºयाला धक्काबुक्की केली. तलाठी धांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश कुºहे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३५३, ३३२, ५०४, १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली.
रिसोड तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:39 PM