कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:47 PM
कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; कारंजा, शेलुबाजारची बाजारपेठ बंदच !
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून कारंजा व शेलुबाजार येथील व्यापारी संघटनांनी आपापली दुकाने २३ जून रोजी देखील बंद ठेवली .परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर रिसोड, शेलुबाजार, कारंजा येथील व्यापाºयांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता शेलूबाजार, कारंजा येथे बाजारपेठ मंगळवारीही बंद आहे. रिसोड येथे १४ ते १७ जून यादरम्यान बाजारपेठ बंद होती. कारंजा येथे २१ जूनपासून दुपारी २ वाजता नंतर बाजारपेठ बंद ठेवली जात आहे.