लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून रिसोड, वाशिम व शेलुबाजार येथील व्यापारी संघटनांनी तीन दिवस आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन १४ जून रोजी केले होते. त्यानुसार, १५ जून रोजी रिसोड व शेलुबाजारची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली तर वाशिम येथे व्यापारी संघटनांमध्ये एकमत न झाल्याने बाजारपेठ बंदला अत्यल्प प्रतिसाद लाभला.परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर रिसोड, शेलुबाजार, वाशिम येथील व्यापाºयांनी तीन, चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवार, १५ जून रोजी रिसोड व शेलुबाजार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. वाशिम येथे मात्र व्यापाºयांमध्ये एकमत होउ न शकल्याने ९० टक्क्यांपेक्षा अधिक दुकाने सुरू होती.
कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न; रिसोड, शेलुबाजारची बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 4:42 PM