कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे कमाल दर मर्यादा, तसेच खासगी वाहने व रुग्णवाहिकांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. त्यावर ‘वाॅच’ ठेवण्याकरिता विशेष पथक गठीत करण्यात आले आहेत.
..............................
ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा कायम
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अडकलेल्या अधिकांश रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. यामुळे मागणीमध्ये वाढ झाल्याने सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, घरीच उपचार घेत असलेल्या विविध दुर्धर आजारांमधील रुग्ण सिलिंडर मिळत नसल्याने हैराण झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून, शासकीय व खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. यामुळे खासगीत होणारा सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने, घरीच उपचार घेत असलेल्या विविध दुर्धर आजारांमधील रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे.
........................
बांधबंदिस्तीच्या कामांना आला वेग
वाशिम : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पाणलोट विकास योजनेंतर्गत शेतशिवारांमध्ये बांधबंदिस्तीची कामे सध्या वेगात सुरू आहेत.
पाणलोट विकास योजनेंतर्गत विविध कामे केली जात आहेत. त्यात शेताच्या बांधबंदिस्तीचाही समावेश असून, वाशिम तालुक्यातील काही गावांमध्ये या कामांनी वेग धरला आहे.