शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील अनेक विकास कामांसह शौचालयांची कामे रेतीघाट लिलावाअभावी रखडली आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजून रेती घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
रेतीच नसल्याने शौचालयाच्या कामासह घरकुलाचे कामेही प्रभावित झाली असून काही रेती विक्रेते मनमानी करताना दिसून येत आहेत. पूर्णा येथून काही जण रेती आणून विकत असल्याचे परिसरात चित्र आहे. यामुळे नियमानुसार हर्रासीनंतर रेती विकणाºयांची व ट्रक्टरधारकांचा रोजगार बुडाला आहे. जिल्हयातील रेती घाटाची हर्रासी रखडलेल्याने मसलापेन, शिरपूरला २५०० ते ३००० हजार रुपये प्रति ब्रास रेती ट्रॅक्टर व्दारे मिळत आहे. याबाबत चौकशी केली असता हर्रासी न झाल्याने पुर्णा येथूनच जास्त भावात रेती घ्यावी लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. रिसोड तालुक्यात रेघीघाटाची संख्या अधिक असल्याने तेथून शासनाला कोटयावधीचा महसूल प्राप्त होउ शकतो पंरतु हर्रासी न झाल्याने या रेती घाटातून दररोज रेतीची तस्करी होत आहे. याकडे मात्र कुणाचेच लक्ष दिसून येत नाही. प्रशासनाने याची दखल घेवून रेती घाटाच्या हर्रासीसाठी पावले उचलणे आवश्यक झाले आहे.
विविध बांधकामे करणाºयांची अडचण बघता जिल्हाप्रशासनाने रेती घाटाची हर्रासी लवकरात लवकर करावी , जेणे करून रेतीची तस्करी होणार नाही व लोकांना अधिक दराने सुध्दा जिल्हा बाहेरून रेती आणावी लागणार नाही.
- अमित झनक, आमदार , मालेगाव - रिसोड विधानसभा मतदार संघ