किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.याबाबत अधिक माहिती अशी, की मालेगावकडून शेलुबाजारकडे भरधाव वेगात जात असलेल्या एम.एच.२८ जे ४१८ या क्रमाकांच्या इंडिका कारने ट्रकला मागून जोरधार धडक दिली. त्यात इंडिका कारमध्ये असलेले यवतमाळ येथील एकाच कुटूंबातील महिला व पुरुष हे गंभीर जखमी झाले. याशिवाय या दाम्पत्याची दोन लहान मुले आणि कारचा चालक किरकोळ जखमी आहेत. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी किन्हीराजा येथील सादीक खॉ पठाण, आसिफ खॉ पठाण, कवरदरी येथील विलास तायडे यांनी कारमध्ये दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याकामी पुढाकार घेतला. त्यांना एका खाजगी वाहनाने उपचाराकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले. या युवकांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे कारखाली दबलेल्या व्यक्तींचे प्राण वाचू शकले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 6:24 PM
किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.
ठळक मुद्दे मालेगावकडून शेलुबाजारकडे भरधाव वेगात जात असलेल्या एम.एच.२८ जे ४१८ या क्रमाकांच्या इंडिका कारने ट्रकला मागून जोरधार धडक दिली. इंडिका कारमध्ये असलेले यवतमाळ येथील एकाच कुटूंबातील महिला व पुरुष हे गंभीर जखमी झाले. याशिवाय या दाम्पत्याची दोन लहान मुले आणि कारचा चालक किरकोळ जखमी आहेत.