लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: भरधाव आॅटोरिक्षा उलटून घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील कारंजा मार्गावर मंगळसा फाट्यानजिक रविवार ३० जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सागर मोटे (२२) असे मृतकाचे नाव असून, प्रदीप संतोष खोडेकर (१४) आणि आकाश मोटे (२२) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारंजा तालुक्यातील रहिवासी असलेले सागर मोटे, आकाश मोटे आणि प्रदीप खोडेकर हे मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापूर येथे आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. तेथून एमएच-३७, जी ५९२३ क्रमांकाच्या आॅटोने परत येत असताना मंगळसा फाट्यानजिक आॅटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेला आॅटोरिक्षा उलटला. या अपघातात सागर मोटे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रदीप संतोष खोडेकर आणि आकाश मोटे हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींवर मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात जुजबी उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहित असेपर्यंत मंगरुळपीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.
आॅटोला अपघात, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 7:46 PM
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: भरधाव आॅटोरिक्षा उलटून घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील कारंजा मार्गावर मंगळसा फाट्यानजिक रविवार ३० जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सागर मोटे (२२) असे मृतकाचे नाव असून, प्रदीप संतोष खोडेकर (१४) आणि आकाश मोटे (२२) अशी गंभीर ...
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील घटना१४ वर्षीय मुलासह दोन गंभीर