लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला युरियाच्या खत्याच्या मागणीत वाढ झाल्याने काही जिल्ह्यात कृषी विभागाला युरियाचा संरक्षीत साठा करणे शक्य झाले नाही. आता या खताला पुरेशी मागणी नसल्याने कंपन्यांनी कृषी विभागाल खते देण्याची तयारी दर्शविली आहे.शासनाच्या २२ मे २०२०च्या निर्णयानुसार कृषी आयुक्तालयाने युरिया खताच्या संरक्षीत साठा करण्याच्या सुचना सर्व जिल्ह्याच्या कृषी विभागाला दिल्या होत्या; परंतु खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरिया खताची मोठ्या प्रमाणात मागणी व वापर झाला. त्यामुळे युरिया खताचा तूटवडा निर्माण झाला होता. त्यातच कंपन्यांनी संरक्षीत साठ्यासाठी कृषी विभागाला आवश्यक प्रमाणात या खताचा पूरवठा करण्यात असमर्थता दर्शविली होती. आता खरीप हंगाम संपत असताना बाजारात युरियाची मागणी घटली आहे. त्यामुळे कंपन्यांनी कृषी विभागाला हे खत देण्याची तयारी दर्शविली असून, ज्या जिल्ह्यात युरिया खताचा संरक्षीत साठा झालेला नाही. त्या जिल्ह्यांनी निर्धारित उद्दिष्टाप्रमाणे युरिया खताचा संरक्षीत साठा करून ठेवावा, अशा सूचना विभागीय महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांकडून २९ सप्टेंबर रोजी देण्यात आल्या आहेत.
संरक्षीत साठ्यासाठी युरियाची उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:23 PM