शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मंगरुळपीर तालुक्यात पावसाची सरासरी १७१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:25 AM

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जूनपासून १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३०० मि.मी. पाऊस ...

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जूनपासून १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३०० मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात यावर्षी याच कालावधीत ३९१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या १३०.६ टक्के आहे. जिल्ह्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला. तथापि, १ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने २० जूनपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत पावसाने खंड दिला होता. त्यामुळे वीतभर वाढलेली खरीप पिके संकटात सापडली होती. जुलै महिन्यातील दुस-या आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. तेव्हापासून जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडतच आहे. त्यात गत आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने सरासरीत वाढ झाली आहे.

-----------------

कारंजात पावसाची १० टक्के तूट

कारंजा तालुक्यात जून ते सप्टेंबरदरम्यान अर्थात पावसाळ्याच्या एकूण सरासरीत ७२२.६ मि. मी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते १७ जुलैदरम्यान -२९४.०० मि. मी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात याच कालावधीत कारंजा तालुक्यात केवळ २६४.५ मि.मी. पाऊस पडला आहे. हे प्रमाण आजवरच्या कालावधीतील सरासरीच्या ९०.०० टक्के आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यात पावसाची १० टक्के तूट आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ३६.६ टक्के आहे. अर्थात तालुक्यातील पावसाची तूट भरून निघण्यासाठी पुढील काळात दमदार पावसाची गरज आहे.

-------------------------

मानो-यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस

जिल्ह्यात यंदा मंगरुळपीर तालुक्याच्या खालोखाल मानोरा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. या तालुक्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत अर्थात वार्षिक सरासरी ७१३.० पाऊस अपेक्षित असतो. त्यात १ जून ते १७ जुलैपर्यंतच या तालुक्यात ४२९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६०.१ टक्के आहे. दमदार पावसामुळे या तालुक्यातील २३ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक जलसाठाही झाला असल्याने शेतक-यांना सिंचनासाठी पाण्याचा आधार मिळण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

तालुकानिहाय अपेक्षित आणि प्रत्यक्ष पाऊस (१ जून ते १७ जुलै)

तालुका - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस -टक्के

वाशिम - ३४६.२ - ३८७.६ - ११२.०

रिसोड - २९६.७ - ४२५.५ - १४३.४

मालेगाव - ३०१.६ - ४११.९ - १३६.६

मंगरुळपीर - २६३.१ - ४५०.०० - १७१.००

मानोरा - २७१.७ - ४२९.१ - १५७.९

कारंजा -२९४.०० २६४.५ - ९०.००

----------