मंगरूळपीर : मोझरी येथे बांधण्यात आलेल्या स्विचरूमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची माहिती अधिकाराअंतर्गत मागितली आहे.परंतु, ती देण्यास संबंधित ग्रा.पं.प्रशासन टाळाटाळ करीत असून शासन निधीचा अपहार करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर लांडकर यांनी केली आहे. लांडकर यांनी पं.स. गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, मोझरी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीवर स्विचरूमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. यामध्ये शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लांडकर यांनी केली आहे. तसेच या कामाची माहिती मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला असता ग्रा.पं.सचिवाकडून टाळाटाळ करण्यात आली. यानंतर अपिल करण्यात आली असता गटविकास अधिकारी यांनी सुनावणी घेऊन संबंधित माहिती तत्कालीन सचिवाकडून देण्यात येईल असे सांगितले. परंतु,तरीसुद्धा माहिती देण्यात आली नसून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लांडकर यांनी केली आहे.
माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
By admin | Published: June 12, 2014 10:58 PM