शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

वाशिम जिल्ह्यातील हिरकणी कक्षांना टाळे

By admin | Published: December 22, 2014 1:25 AM

बस स्थानकावर महिलांची कुचंबणा : आगार प्रशासनाचे दुर्लक्ष.

वाशिम : भुकेल्या तान्हुल्याला स्तनपान देताना मातांची होणारी कुचंबणा रोखण्याचा गाजावाजा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकावर सुरू केलेले हिरकणी कक्ष दिवसरात्र कुलूपबंदच राहतात. परिणामी, महामंडळाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासल्या जात असून, मातांची कुचंबणा अद्यापही सुरूच आहे. लोकमतने २१ डिसेंबरला केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब अधोरेखित झाली आहे.महिलांना आपल्या तान्हुल्या बाळांना घेऊन एसटी तून प्रवास करावा लागत असतो. बस स्थानकावरील गोंधळ, गर्दी लाऊडस्पीकर, कर्कश आवाज यामुळे लहान मुले अधिक रडू लागल्याने मातांना त्यांना उघड्यावर दूध पाजावे लागते. परिणामी, त्यांची कुचंबणा होते. नेमकी हीच बाब हेरून राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर मातांना सुरक्षित स्तनपान करता यावे यासाठी एक कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड येथील बसस्थानही याला अपवाद नाही; मात्र धक्कादायक बाब म्हणजे, येथील गचाळ व्यवस्थापनामुळे हा कक्ष नेहमीच कुलूपबंद राहत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीचे तर सोडा; पण दिवसाही या कक्षाचे कुलूप उघडायला प्रशासनाकडे वेळ दिसून येत नाही. परिणामी मातांची कुचंबणा सुरूच आहे. वाशिमप्रमाणेच इतर बसस्थानकावरील हिरकणी कक्षाची परिस्थिती आहे.