लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोहरादेवी ता. मानोरा येथील धार्मिक कार्यक्रमात जनसागर उसळणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध शासकीय योजना, उपक्रमांचे जनजागृतीपर पोस्टर्स् लावण्यात आले होते. बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, व्यसनमुक्ती आदींचा संदेश देण्यात आला.स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तरातील तफावत कमी करण्याबरोबरच मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविले जात आहे. या अभियानात वाशिम जिल्ह्याचा समावेश असून, पोहरादेवी येथील धार्मिक कार्यक्रमात उपस्थितांना बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने ठिकठिकाणी बंजारा बोलीभाषेत असलेले पोस्टसर्् लावण्यात आले होते. याप्रमाणेच व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत मिशन आदींचेही पोस्टसर्् लावण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशनच्या चमूने स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी बकेट व अन्य सुविधा उपलब्ध केल्या होत्या.
पोहरादेवीत शासकीय योजनांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 4:06 PM