सुनील काकडे, वाशिम: शेती व पुरक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील पुरस्कारांनी दरवर्षी गाैरविण्यात येते. त्यानुसार, २०२० पासून २०२२ पर्यंत पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासंबंधीचे निर्देश शासन निर्णयाद्वारे २३ फेब्रुवारी रोजी देण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांचा समावेश आहे.
अजय हिरामण ढोक (इंझोरी, ता. मानोरा) यांना २०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, २०२१ मध्ये पुजा अजय ढोक (इंझोरी, ता. मानोरा) यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, रवींद्र जयाजी गायकवाड (गायवळ, ता. कारंजा) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, दिलीप अर्जुन कंकाळ (सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी, मानोरा) यांना पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार, २०२२ मध्ये दिलीप उर्फ रामदास नारायण फुके (चांभई, ता.मंगरूळपीर) यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, भागवत श्रीराम ढोबळे (बाभूळगाव, ता.वाशिम) यांना कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार; तर युवराज पुंडिलकराव आव्हाळे (जांब, ता.मंगरूळपीर) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला.
दरम्यान, पुरस्कार जाहीर झालेल्या संबंधित प्रयोगशिल शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय पारित झाला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.