शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

गायवळ, धोत्रा जहागिर येथे शेतीपुरक व्यवसायाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:30 AM

कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून उत्पादन वाढीस चालना देण्याच्या हेतूने दत्तक ग्राम योजना राबविली जाते. यात दर तीन ...

कृषी विज्ञान केंद्राकडून तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून उत्पादन वाढीस चालना देण्याच्या हेतूने दत्तक ग्राम योजना राबविली जाते. यात दर तीन वर्षांनी नवीन गावांची निवड करण्यात येत असून, २०२१ पासून पुढील तीन वर्षांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात कारंजा तालुक्यातील गायवळ व धोत्रा जहागीर या दोन गावांचा समावेश आहे. या दोन्ही गावात १५ जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, एस. के. देशमुख, शुभांगी वाटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्यातून शेतीवरील खर्च कमी करून पुरक व्यवसायाला चालना देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला धोत्रा जहागीर येथील कार्यक्रमात गावचे सरपंच शीला पवार, पोलिस पाटील निलेश घाये तसेच ग्रामपंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष जीवन जाधव, उमेद प्रकल्पातील तालुका व्यवस्थापक आरती अघम, देवेंद्र गोवर्धन, कृषी सखी किरण उमाळे, संगणक तज्ज्ञ संकेत राठोड व इतर अधिकारी तसेच गावातील प्रगतशील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थिती होते. अशाच प्रकारचा कार्यक्रम गायवळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला. कार्यक्रमात गावचे सरपंच सतीश अरूण राऊत, उपसरपंच बाळकृष्ण व्यवहारे व उमेद प्रभाग समन्वयक निशा बोरकर तसेच कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक जी. एल. ढोकणे, कृषी सहायक मंगेश सोळंके यांची उपस्थिती लाभली.

-------------

पोकराच्या योजनांची माहिती

कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) ग्रामस्तरावर सुरू असलेल्या कार्यक्रमाची सखोल माहिती गावकऱ्यांना देऊन तांत्रिकदृष्ट्या पुढील वाटचाल करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील प्रगतशील शेतकरी रवींद्र गायकवाड, रमेश मार्गे आदींनी बीबीएफ तंत्र, शेततळे , तुषार सिंचन, गांडूळखत, फळबाग लागवड, बांधावर वृक्षलागवड इ. उपक्रमाची गावातील परिस्थितीची मांडणी केली.