जिल्हा क्रीडा संकुल येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सलीम सय्यद, पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदळे यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीत परिवहन विभाग, महामार्ग पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पोलीस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, जुनी नगर परिषद, शिवाजी चौक, पाटणी चौक, बसस्थानक, नगर परिषद येथून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत फिरवीत रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत सायकल आर्मी ग्रुप, पोलीस मित्र ग्रुप, मोरया सायकल ग्रुप, वाशिम सायकलस्वार ग्रुपच्या ११० सायकलस्वारांनी सहभाग घेत वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिम व महामार्ग पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सायकल ग्रुपचे महेंद्रसिंग गुलाटी, नंदूभाऊ पाटील, राहुल तुपसांडे, पवन शर्मा, नारायण व्यास व रवींद्र वाघ यांनी परिश्रम घेतले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:37 AM