याप्रसंगी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माहिती सहायक तानाजी घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कन्यादान योजना, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे व दुभत्या जनावरांचे गट वाटप आदी योजनांची जनजागृती सध्या समता चित्ररथाव्दारे करण्यात येत आहे.