----------
कामगारांना स्वयंरोजगाराचे धडे
इंझाेरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबणाऱ्या कामगारांना जलदूत रवींद्र इंगोले हे स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत. रोहयोच्या कामातून मिळालेल्या पैशांमध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, मशरूम उत्पादन, अगरबत्ती व्यवसाय, भाजीपाला विक्री, आदी व्यवसाय कसे उभारायचे या संदर्भात जलदूत इंगोले यांनी मंगळवारी (दि. १६) कामगारांना माहिती दिली.
-----------
‘नो पार्किंग झोन’मध्ये खासगी वाहने
रिसोड : रिसोड शहरातील बसस्थानकाच्या परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असतानाही येथे सर्रास खासगी प्रवासी वाहने उभी केली जात आहेत. मध्यंतरी नो पार्किंग झोनमधून खासगी प्रवासी वाहने हटविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.
--------
वातावरणात बदल; पपईचे नुकसान
धनज : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली. सुरुवातीच्या पोषक वातावरणामुळे पपईची रोपे जोमदार झाली; परंतु अचानक उष्णता वाढल्यामुळे हे पीक संकटात सापडले असून पपईची रोपे सुकत आहेत.