मालेगाव (वाशिम): येथे गेल्या काही दिवसांपासून पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोडरोमियोंचा अक्षरश: सुळसुळाट झाला असून शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या सुमारास ही मुले विद्यार्थीनींना त्रास देण्याच्या उद्देशाने शाळांबाहेर उभे राहत आहेत. अशा रोडरोमियोंचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे ३ डिसेंबरला निवेदन सादर केले. पोलिस प्रशासनाने याकामी लक्ष न दिल्यास बजरंग दल आक्रमक पवित्रा घेईल, असे निवेदनात नमूद आहे.गत काही दिवसांपासून काही अपप्रवृत्तीच्या टवाळखोर मुलांनी गावातील शाळा व कॉलेजच्या मुलींना नाहक त्रास देणे सुरू केले आहे. हा प्रकार सद्या मोठ्या प्रमाणात फोफावला असून छेडखानीच्या घटनाही सभोवताल घडत आहत. अनेक अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहने चालवून विद्यार्थीनींचा पिच्छा देखील पुरवत असल्याचा प्रकार घडत आहे. सामाजिक दडपणामुळे यासंदर्भात उघडपणे बोलण्यास अथवा तक्रार करण्यास मुली धजावत नाहीत. त्याचाच गैरफायदा गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून घेतला जात आहे. एकूणच या सर्व गंभीर बाबींकडे गांभीर्याने लक्ष पुरवून भविष्यात घडू पाहणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने अशा रोडरोमियोंचा तत्काळ बंदोबस्त करावा; अन्यथा मोठे आंदोलन उभारावे लागेन, असा इशारा बजरंग दलाने निवेदनात दिला आहे.
रोडरोमियोंवर वचक बसविण्यासाठी बजरंग दल आक्रमक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:35 PM
मालेगाव (वाशिम): रोडरोमियोंचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे ३ डिसेंबरला निवेदन सादर केले. पोलिस प्रशासनाने याकामी लक्ष न दिल्यास बजरंग दल आक्रमक पवित्रा घेईल, असे निवेदनात नमूद आहे.
ठळक मुद्देपोलिस प्रशासनाला निवेदन शालेय विद्यार्थीनींच्या सुरक्षेची मागणी