लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती, राष्टÑीय सेवा योजनातर्फे वाशिम जिल्हयात विविध ठिकाणी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रम राबविणे सुरु आहे. या अभियानाचे उदघाटन सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम येथे करुन या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय चौधरी होते. प्रमुख मार्गदर्शन म्हणून राजाभाऊ इंगळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. शुभांगी दामले यांनी केले. विद्यापिठाने बळीराजा चेतना अभियान का राबविले याची विस्तृत माहिती दिली. या अभियानातून शेतकरी आत्महत्यापासून परावृत्त करणे, त्यांचे मनोबल वाढविणे, शेती सोबतच जोडधंदा करुन त्याची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा असल्याचे प्रा. शुभांगी दामले यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रमुख मार्गदर्शक राजाभाऊ इंगळे यांनी सेंंद्रिय शेतीची गरज यावर मार्गदर्शन केले. सर्व रोगांचे मूळ कारण विषयुक्त फवारणी हे आहे. म्हणून सेंद्रीय शेतीला प्राधान्य दयावे, तसेच नापिकीचे कारणही विषयुक्त फवारणीच आहे े सांगितले. शेतकºयांचे आर्थीक स्तोत्र मुख्य शेतीेच. उत्पन्न झाले नाही म्हणून शेतकºयांवर आत्महत्येची पाळी येते, हे टाळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासचा सल्ला दिला. या विषयावर विद्यार्थ्यांचा संवाद राजाभाऊ इंगळे यांच्या सोबत घडून आला. शेतकºयांच्या शंकाचे समाधानही करण्यात आले. यावेळी बंडु इढोळे, लक्ष्मण बयस या शेतकरी प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. तसेच पर्यटनासाठी शेती हा नविन विषयाचे मार्गदर्शन प्रा. प्रगत पडघान यांनी केले. समृध्द शेतकरी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग शेतकºयांनी केले पाहिजे. ज्यातून शेतीसोबत दुसºया पार्यायही आर्थीक बाजू वाढविण्यासाठी पुरक ठरु शकतो त्यासाठी येथील शेती पर्यटन चांगला पर्याय ठरु शकतो . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय चौधरी यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात आपण सर्व शेतकºयांची मुल आहोत आणि मुलींनी सुध्दा आता प्रगत शेती आणि आधुनिक शेती व्यवसायाकडे बघावे. नर्सरी सारख्या व्यवसायाकडे लक्ष देवून शिकसोबत आर्थीक मिळकत करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश राठोड यांनी व आभार प्रा.अनिल खाडे यांनी मानले.
वाशिम जिल्हयात बळीराजा चेतना अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 3:46 PM