शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 2:07 PM

वाशिम : निकृष्ट व भेसळीच्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून महाबीजने यंदाच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पात परराज्यातील कंपन्यांच्या बियाणे वितरणावर नियंत्रण आणले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निकृष्ट व भेसळीच्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून महाबीजने यंदाच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पात परराज्यातील कंपन्यांच्या बियाणे वितरणावर नियंत्रण आणले आहे. त्यातच बिजोत्पादनातंर्गत उत्पादन क्षमता वाढीसाठी जुन्या वाणांचे प्रमाण कमी करून नव्या वाणांवर भर देण्यात येणार असून, प्रयोगशाळेत सर्व निकषावर यशस्वी ठरलेल्या बियाण्यांचे शेतकºयांना वितरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर महाबीजकडून बिजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. त्यात सोयाबीनचे क्षेत्र १२ हजार १९५ हेक्टर आहे. आता यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजने बिजोत्पादन प्रकल्पासह इतर शेतकºयांना बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली असून, यासाठी निर्धारित २६ हजार क्विंटलपैकी २४ हजार क्विंटल बियाणे संबंधित केंद्रावर पाठविण्यात आले आहे.गत काही वर्षांत महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्याचे निरीक्षण करून यंदाच्या हंगामासाठी बीज तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालावर आधारीत बियाणे महाबीजने उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. त्यात प्रमाणित बियाण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, पायाभूत बियाण्यांच्या तपासणीचे अहवाल मे महिन्याच्या अखेरीस प्राप्त होणार आहेत. त्याशिवाय मागील दोन वर्षांत महाबिजकडून मार्केटिंग करण्यात आलेल्या सोयाबीनच्या वाणांत इतर वाणाचे मिश्रण असल्याचे प्रकार घडले होते. त्यात गुजरात राज्यातून बोलावलेल्या वाणांत मोठी भेसळ असल्याचे सिद्ध झाले. त्यावेळी शेतकºयांनी मागणी केलेल्या वाणाच्या पेरणीनंतर उगवलेल्या रोपात इतर वाणाच्या रोपांचे प्रमाण अधिक असल्याच्या तक्रारी महाबीजकडे प्राप्त झाल्या होत्या.प्रत्यक्षात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पाव्यतीरिक्त महाबिजच्या नावे मार्केटिंग झालेल्या कंपन्यांच्या वाणात हा प्रकार आढळून आला होता. या पृष्ठभूमीवर महाबीजने यंदाच्या हंगामात महाबीजकडून उत्पादित बियाण्यांचाच अधिकाधिक वापर करताना इतर कंपन्यांच्या मार्केटिंगवर नियंत्रण आणले आहे. शेतकºयांची फसवणूक होऊन महाबीजच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.‘सीड टेस्टिंग लॅब’च्या अहवालावर भरमहाबीजने गतवर्षीच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेल्या शेतमालातून यंदा उत्कृष्ट बियाण्यांचे वितरण करण्यासाठी अकोला येथील सीड टेस्टिंग लेबॉरटरीच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला. या प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीनंतरच शेतकºयांचे बियाणे खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी केलेले बियाणे हे अधिक उच्च दर्जाचे असणार आहे. प्रमाणित बियाण्यांची उगवण क्षमता अकोला येथील प्रयोगशाळेत, तर पायाभूत बियाण्यांची उगवण क्षमता अकोला प्रयोगशाळेसह इतर ठिकाणी करण्यात येत आहे.

गतवर्षी परराज्यातून बोलावलेल्या बियाण्यांत भेसळीचा प्रकार असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यंदा इतर राज्यातील बियाण्यांवर प्रतिबंधच राहिल. त्यातही यंदा महाबीजचे उत्पादन ९ लाख क्विंटल असल्याने बिजोत्पादन प्रकल्पासाठी इतर राज्यांच्या बियाण्यांचा आधार घेण्याची गरज भासणार नाही.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीजagricultureशेतीFarmerशेतकरी