वाशिम : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या आदेशात अंशतः बदल करून १९ मे रोजी सुधारित आदेश जारी करण्यात आले. यानुसार बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले. १७ मे रोजी कडक निर्बंधांच्या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र बँकेच्या कामासाठी सुरु राहतील, असा उल्लेख करण्यात आला होता. या आदेशात पुन्हा १९ मे रोजी बदल केला असून आपले सरकार सेवा केंद्राऐवजी जिल्ह्यातील बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. २० मे रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आपले सरकर सेवा केंद्र पूर्णतः बंद राहणार आहेत.