- संतोष वानखडेवाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. दुसरीकडे खरिप हंगाम २०१९ मध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्चपूर्वी पीककर्जाची वसुली व्हावी यासाठी बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सन २०१९ च्या खरीप हंगामात पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी मार्च २०२० पर्यंत पीककर्जाचा भरणा करण्याची अंतिम मुदत आहे. परंतू, कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात ‘लॉक डाऊन’ची स्थिती आहे. यामुळे शेतमालाची विक्री करणे यासह शेतकºयांचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू असताना आणि लॉक डाऊनची स्थिती असतानाही बँकांच्या प्रतिनिधींकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावा, असा तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला नाही तर शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. दरम्यान शेतकºयांना व्याजाचा भुर्दंड बसू नये म्हणून आमदार अमित झनक यांनी २४ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकºयांची भीषण परिस्थिती विषद केली. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे संकट आणि संचारबंदीमुळे शेतकºयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी पीककर्जाचा भरणा करण्यासाठी असमर्थ असल्याने विविध बँकांचे कर्ज भरण्यास शेतकºयांना एका महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार झनक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीककर्जाची उचल करणाºया शेतकºयांनी ३१ मार्च २०२० पूर्वी पीककर्जाचा भरणा केला तर व्याज आकारले जाणार नाही, असे शासनाचे निर्देश आहे. पीककर्जाचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्रव्यवहार नाही. आम्ही पीककर्जासाठी शेतकºयांकडे तगादा लावत नाही.- व्ही.बी. महाले, बँक निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाशिम
पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:34 PM