शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 2:39 PM

सर्व कागदपत्रांची पुर्तता करून आणि पात्र असतानाही ‘मार्च एन्डींग’च्या नावाखाली कर्ज मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बेरोजगार युवकांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी अंमलात आलेल्या ‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये हल्ली वाढ झाली आहे. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून आणि पात्र असतानाही ‘मार्च एन्डींग’च्या नावाखाली कर्ज मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ पासून २० हजार करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँक कर्ज योजना अंमलात आली. यामाध्यमातून छोटे कारखानदार, दुकानदारांना कर्ज देणे, ज्यांना नवा उद्योग करायचा असेल त्यांनाही कर्ज पुरवठा करण्यासोबतच भाजीविक्रेते, सलून, फेरीवाले, चहाटपरी चालकांना कर्ज देण्याचे शासनाने जाहीर केले. शिशू श्रेणीअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज, किशोर श्रेणीत ५० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि तरुण श्रेणीअंतर्गत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करूनही अनेक पात्र बेरोजगार युवकांना बँकांकडून कर्ज मिळणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे बेरोजगारांमधून संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षात वाशिम जिल्ह्याने उद्दीष्ट पूर्ण केले असून ९५ कोटींचा कर्जपुरवठा यामाध्यमातून करण्यात आला आहे.- डी.व्ही. निनावकरव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना