लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: किटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊ नये म्हणून प्रोफेनोफोस व सौपरमेथ्रीन, फिप्रोनील व इमोडॅक्लोप्रीड, एॅफिसेट, डिफेन्थोरोन, मोनोक्रोटोफॉस या पाच किटकनाशकांवर कृषी विभागाने बंदी आणली असून, या किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी शुक्रवारी केले.पिकांवरील किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या कीटकनाशकांच्या वापर केला जातो. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. किटकनाशक फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. जहाल किटकनाशकामुळे होणारी संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी कृषी विभागाने पाच किटकनाशकांवर बंदी आणली आहे. प्रोफेनोफोस व सौपरमेथ्रीन, फिप्रोनील व इमोडॅक्लोप्रीड, एॅफिसेट, डिफेन्थोरोन, मोनोक्रोटोफॉस ही पाच किटकनाशके कृषी सेवा केंद्रात ठेवू नये तसेच शेतकऱ्यांनीदेखील या किटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करू नये, असे आवाहन कृषी अधिकारी भद्रोड यांनी केले.
पाच किटकनाशकांवर बंदी; वापर न करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 4:43 PM