बुलडाणा जिल्ह्यातील शेंदुरजना येथील दिनकर एकनाथ शिंगणे (४४) कल्याणी दिनकर शिंगणे (१८) हे अमरावती येथे कुटुंबीयांसोबत शिवकन्या एकनाथ शिंगणे हिच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी गेले होते. अमरावती येथून परत जात असताना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरहद पिंपरी येथे त्यांच्या एम. एच. ११ सी. डब्ल्यू ०४३६ या कारला मेहकरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनर एम. एच. १७ बी. व्ही. ६४८९ ने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दिनकर एकनाथ शिंगणे व कल्याणी दिनकर शिंगणे या बापलेकीचा जाग्यावरच मृत्यू झाला. या अपघातात नंदकिशोर शिंगणे, अशोक एकनाथ शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, धनंजय शिंगणे, शिवकन्या शिंगणे व कारचालक योगेश बबन इधारे हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला.
अपघातात बापलेकीचा जागेवरच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:23 AM