वाशिम : शांतचित्ताने केलेले जेवण पचण्यासाठी केव्हाही चांगले. अलीकडच्या काळात टीव्ही पाहत, वाचन करत, मोबाइल बघत जेवण करणे म्हणजे थेट पोटविकारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. अन्न व्यवस्थितरित्या पचन होत नसल्याने अपचनापासून पोटाचे अनेक विकार आणि पर्यायाने त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. जेवताना आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन बऱ्याच प्रमाणात प्रभावित झाले होते. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. कोरोना विषाणूचा परिणाम फुप्फुसांवर झाला, तसा तो आतड्यांवरही झाला आहे. कोविडमधून बरे झालेल्या काही जणांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. जेवण करताना अन्न पचन होईल, अशा पद्धतीने जेवणाची बैठक व्यवस्था असायला हवी. अस्वच्छ ठिकाणी बसून खाणे, बाहेरचे अन्न, न शिजलेले अन्न यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. जेवणाची बैठकदेखील व्यवस्थित असायला हवी. मोबाइल, टीव्हीसमोर बसून जेवण करण्यापेक्षा कुटुंबात बसून शांतचित्ताने जेवण केल्यास अन्न पचनक्रिया सुरळीत होऊ शकते, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
०००००००
बॉक्स
पोटविकाराची प्रमुख कारणे
बाहेरचे न शिजलेले अन्नपदार्थ खाणे, बदललेली जीवनशैली पोटविकार वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. यात प्रामुख्याने जेवण करताना टीव्ही किंवा मोबाइल पाहण्याची वाईट सवय जवळपास सर्वच वयोगटाला लागली आहे. जेवणाकडे लक्ष नसेल तर अन्न किती वेळा चावतोय, ते नीट चावलं गेलंय का याचे भान राहत नाही. परिणामी पोटाचे किरकोळ विकार सुरू होतात.
........
२. पोटविकार टाळायचे असतील तर...!
जेवण करताना मानसिकदृष्ट्या आपण त्यात गुंतणं आवश्यक आहे. टीव्ही, मोबाइल बघत जेवण सुरू असेल तर त्याचा पचनक्रियेवर भलताच परिणाम जाणवतो. मानसिकदृष्ट्या जेवणात आपण एकरूप नाही झालो तर लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. लाळ जेवढी चांगली जेवणात मिसळते तेवढे चांगले पचन होते. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, अस्वच्छ ठिकाणी बसून तसेच न शिजलेले अन्न खाऊ नये.
०००००
कोट :
गृहिणी
१) जेवण करताना मुलांना शक्यतोवर मोबाइल दिला जात नाही तसेच टीव्ही लावली जात नाही. आम्ही स्वयंपाकघरातच जेवतो. कधी कधी मुलं मोबाइल, टीव्हीचा हट्ट धरतात. त्यावेळी मुलांना समजावणे कठीण होऊन जाते.
- सुनीता लाहोरे, गृहिणी
२) टीव्हीसमोर बसून कधी कधी मुले जेवण करतात. शक्यतोवर स्वयंपाकघरात बसूनच जेवण केले जाते. सर्व सोबत जेवण करीत असतो, त्यावेळी टीव्ही पाहणे टाळले जाते.
- सिंधुबाई सरकटे, गृहिणी
३) मुलांच्या आहारावर विशेष लक्ष असते. मात्र, कधी कधी मुले टीव्ही व मोबाइलचा हट्ट धरतात. शक्यतोवर जेवताना मुलांना मोबाइल किंवा टीव्ही पाहू दिला जात नाही.
द्रौपदी महादेव सोळंके
०००००००००००००००००००
डॉक्टर कोट
१) अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी शक्यतोवर टीव्हीसमोर बसून किंवा मोबाइल देऊन मुलांना जेवण न दिलेले केव्हाही चांगले. टीव्ही, मोबाइलची सवय मोडली तर मुले व्यवस्थित जेवण करतील. पर्यायाने पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
- डॉ. राजेंद्र पांडे, पोटविकार तज्ज्ञ
०००
२. तुमचं खाणं आणि ते योग्य पध्दतीने पचवणं ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेवताना मुलांची मोबाइल किंवा टीव्ही बघणे ही सवय मोडणे पालकांच्या हाती आहे.चांगल्या पद्धतीने जेवण केले तर ते मुलांना अधिक पचन होईल.
- डॉ. नीलेश बडे, पोटविकार तज्ज्ञ
०००
३. स्वच्छ ठिकाणी बसून, पूर्ण शिजलेले घरचे अन्न खाणे हे शरीरासाठी आवश्यक आहे. मुलांना जेवण देताना पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. टीव्हीसमोर बसून किंवा मोबाइल देऊन मुलांना जेऊ घालणे ही पद्धती योग्य ठरणार नाही.
डॉ. अनिल कड, पोटविकार तज्ज्ञ