मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर जोडीदार शोधताना काही दिवसांपूर्वी एक महिला अभियंता अशाच घटनेची शिकार झाली. जोडीदार शोधताना तिची ओळख अशाच फसव्या व्यक्तीबरोबर झाली व त्या महिलेचे १० लाखांचे नुकसान झाले. मॅट्रोमिनी स्कॅम्सचे प्रकार वाढले असून, पुरुषांबरोबर महिला देखील या जाळ्यात अडकत आहेत. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने आपल्या सायबर-सेफ्टी आणि सायबर सायकर सिक्युरिटीचे ट्विटर हँडल सायबर दोस्तवरून युजर्सला काही सूचना दिल्या आहेत. यात युजर्सला मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर जोडीदाराचा शोध घेताना काय करावे आणि काय करू नये.
००००००००००००००००००
ही घ्या काळजी
- मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर रजिस्टर करण्यासाठी नवीन ईमेल आयडीचा वापर करावा.
-मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर फोटो, फोन नंबर आणि पत्ता यासारख्या खासगी गोष्टी शेअर करू नयेत,
-कोणत्याही मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. -वेबसाईटचे रिव्ह्यूज वाचावे, कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र, कुटुंबाचा सल्ला घ्या.
००००००००००००००००००
अशी होऊ शकते फसवणूक
- मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फ्रॉड करणारे कोणतीही इर्मजन्सी असल्याचे सांगून पैसे खात्यात टाकण्यास सांगतात. मागील काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत.
- तसेच मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फ्रॉड करणारे तुम्हाला गिफ्ट पाठवले असून, त्यासाठी टॅक्स मनी ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक करतात. त्यामुळे अशा भानगडीत पडू नये.
००००००००००००००००००
सायबर सेलच्या अधिकाऱ्याच्या कोट
कोट: ऑनलाइन पद्धतीने जाेडीदार शोधणे अनेकदा घातक ठरू शकते. मॅट्रोमोनिअल वेबसाईट्सद्वारे फसवणुकीचे प्रकार देशात वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यात एवढ्यात तरी अशी कोणती घटना घडली नाही. कोणाची फसवणूक झाली असल्यास आम्हाला कळवावे. यात मुलीच नव्हे, तर मुलांचीही फसवणूक होऊ शकते.
-रहिम शेख,
सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.