वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली. शिवाजी वामन शिंदे, असे जखमीचे नाव असून, अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने मोठी दुखापत झाली आहे. शिवाजी शिंदे हे सकाळच्या सुमारास गोगरी येथील शिवारात लघूशंकेसाठी गेले होते. लघूशंक करीत असतानाच अचानक तेथे अस्वल आले आणि त्यापे शिवाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. यात अस्वलाने त्यांच्या हातावर नखाने ओरबडले, तर पायाला चावा घेतला. त्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली. हा प्रकार लोकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलात पळून गेले. त्यानंतर शिवाजी शिंदे यांना उपचारासाठी शेलूबाजार येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर येडशी बिटच्या वनरक्षक पी. जी. अहिर, कोळंबी बिटचे वनरक्षक जी. बी. जामकर, वनोजा बिटचे वनरक्षक एम. बी. देवकते यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे व वनमजुरांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि विलास शंकरराव शिंदे रा. गोगरी, प्रमोद दौलतराव शिंदे रा. गोगरी यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे स्वाक्षरीनिशी वनरक्षक पी. जी. शिंदे यांनी पंचनामा केला.
लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 5:22 PM
वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली.
ठळक मुद्देशिवाजी शिंदे हे सकाळच्या सुमारास गोगरी येथील शिवारात लघूशंकेसाठी गेले होते.अचानक तेथे अस्वल आले आणि त्यापे शिवाजी शिंदे यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार लोकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलात पळून गेले.