वाशिम, दि. 31 - शासनाच्या खरेदीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शेतक-यांची तूर खरेदी न करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे मालेगाव बाजार समितीमध्ये दिसून आले. याबाबतचे त्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करुन ताबडतोब तूर खरेदी करण्याची मागणी करण्यात आली.गेल्या दोन महिन्याआधी शेतक-यांना तूर खरेदीचे टोकन देऊनही शेतक-यांचा नंबर लागल्यावरही तूर खरेदी होत नसल्याने शेतकरी ३१ ऑगस्ट रोजी आक्रमक झालेत. सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली व आपली आपबिती कथन केली. निवेदनात नमूद केले की, ३१ ऑगस्टपासून तूर खरेदी बंद होणार आहे. आम्हा शेतक-यांना तीन महिन्यापासून टोकन नंबर मिळालेले आहे. आमचा नंबर आज ३१ ऑगस्ट रोजी आला असता तूर खरेदी सुरु झालेली नाही. तरी आमचा माल त्वरित मोजून घ्यावा अन्यथा तूर मार्केट यार्डातच राहू देण्याचा इशारा शेतक-यांनी दिला.
तूर खरेदी होत नसल्याने वाशिममधील शेतकरी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 6:52 PM