वाशिम: जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नावीन्यपूर्ण अनुसूचित जाती व जमाती नोंदणीकृत शेतकरी गटांना मधुमक्षिकापालनाकरिता प्रोत्साहन देण्याकरिता दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वाशिम यांचेमार्फत डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण सभागृह आत्मा कार्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वालन कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण उपायुक्त माया केदार यांनी केले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उपसंचालक तथा आत्माचे प्रकल्प उपसंचालक नीलेश ठोंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता चौधरी, फलोत्पादन तंत्र अधिकारी भारत कदम, विसरणार तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ तंत्र यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविकात अनिल कंकाळ यांनी कार्यक्रम योजनेबाबत विस्तृत माहिती देऊन मधुमक्षिकापालन व्यवसायात अनुसूचित जाती-जमातींच्या गटांचा सहभाग घेऊन या उपक्रमातून प्रस्तावित कार्यक्रमाची माहिती दिली. माया केदार यांनी लाभार्थींना कृषिपूरक व्यवसायातून अर्थार्जनाची संधी सोडू नका, असे आवाहन केले तसेच लाभार्थी गटांमध्ये महिलांचे गटसुद्धा असल्याने मधुमक्षिका पालन व्यवसायातून महिलांचे सक्षमीकरण होईल, अशी आशा व्यक्त केली. उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता चौधरी यांनी मधुमक्षिका शेतीपूरक व्यवसाय हा सोबतच शेती व फलोत्पादन उत्पन्न वाढवेल म्हणून या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवं, असे मत मांडले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कृषी उपसंचालक ,प्रकल्प उप संचालक आत्मा वाशिम यांनी मधुमक्षिका या पृथ्वीतलावर जगल्या तोवरच शेती तसेच मानवी जीवन शाश्वत आहे, असे वक्तव्य केले सदर कार्यक्रमात संतोष बगाडे यांनी खादी ग्रामोद्योग मंडळ अकोला यांच्या वतीने शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले मधुमक्षिका यांचा जीवन क्रम व कार्यपद्धती मधमाशी पालनासाठी आवश्यक बाबी तसेच विविध योजनाविषयी सखोल माहिती दिली. तसेच वरोरा येथील प्रशांत डेंगळे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश लव्हाळे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाशिम यांनी केले. तर आभार श्री संजय राऊत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन इंगोले, मयूर शिरभाते, प्रतीक राऊत, विजय दुधे, रामेश्वर पाटील प्रशिक्षणार्थीं कार्यक्रम ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली सभागृह व्यवस्थापन तंत्रज्ञान व्यवस्थापक ओम चव्हाण, गुलाम नबी शेख , किशोर राऊत यांनी परिश्रम घेतले. सदर प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील वाशिम रिसोड मंगरूळपीर मालेगाव मानोरा कारंजा तालुक्यातील अनुसूचित जाती ३० तसेच अनुसूचित जमाती २५ शेतकरी गटांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.