शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

नियमाला डावलून रात्री उशिरापर्यंत बियर विक्री 

By admin | Published: May 03, 2017 2:31 PM

शहरालगतच्या मानोली रस्त्यावर बियरशॉपी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात येत असल्याने बियर शौकिनांचा मोठा त्रास ग्रामस्थांना होत आहे.

मंगरूळपीर: महामार्गावरील दारूविक्री बंद झाल्याने दिलासा मिळण्याऐवजी ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. याचा प्रत्यय मंगरुळपीर तालुक्यात येत आहे. शहरालगतच्या मानोली रस्त्यावर बियरशॉपी नियम डावलून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात येत असल्याने बियर शौकिनांचा मोठा त्रास ग्रामस्थांना होत आहे. या त्रासामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी येथील पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे बियर शॉपी वेळेच्या आत बंद होणे आवश्यक ठरते. मात्र मंगरुळपीर शहरालगतच्या नवीन सोनखास परिसरातील एक बियर शॉपी वेळ संपल्यानंतरही सुरू राहते. दारूबंदीनंतर मद्यपींना बियर शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या शॉपीवर बियर पिण्यासाठी मोठी गर्दी होते व अनेक जण तेथेच बियर रिचवतात. त्यामुळे परिसरातील व या रस्त्याने येजा करणाऱ्या महिला व नागरिकांना या बाबींचा त्रास सहन करावा लागत असल्याने काही ग्रामस्थांनी याबाबत येथील पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख यांचेकडे तक्रारी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतची मद्यविक्र ी बंद झाली असून, २२० मिटर अंतराच्या बाहेरील तालुक्यातील एक देशी दारू दुकान व  व २० हजार लोकवस्तीच्या आत म्हणून येथील मानोली रस्त्यावरील एक बियर शॉपी सुरू आहे. सदर बियर शॉपीचा परिसर लोकवस्तीचा असून व तळीराम याच बियर शॉपीच्या परिसरात बसून रात्री बेरात्री पर्यंत बियर पित असल्याने परिसरातील महिलांना व नागरीकांना तसेच या रस्त्याने येजा करणाऱ्या ग्रामस्थांना तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीची दखल उत्पादन शुल्क विभागाने घेऊन सदर बिअर शॉपी चालकाला जागेवरच बियर पिण्याची परवानगी देवू नये अशी मागणी सर्वसामान्यांनी केली आहे.