वाशिम : शासनाने गेल्या वर्षभरापासून परवाना नुतनीकरण नाकारून बंद केलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वाशिम जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून सन २०११ च्या जनगणनेनुसार पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०१६ च्या आदेशावरून राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीतून गेलेल्या मद्यविक्रींची दुकाने १ एप्रिल २०१७ नंतर नुतनीकरण नाकारून बंद करण्यात आली होती. ती सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे; परंतू त्यासाठी चार निकष घालून देण्यात आले आहेत. त्यात किमान ५ हजार लोकसंख्या असणारे ग्रामपंचायत क्षेत्र (२०११ च्या जनगणनेनुसार), ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असणे, जागतिक वारसा पर्यटन स्थळ व केंद्र शासन किंवा राज्य शासनाने घोषित केलेले पर्यटन स्थळ आणि ज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला असेल, अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा परिषदेसह संबंधित इतर यंत्रणांकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे. ती प्राप्त झाल्यानंतरच पुढची कार्यवाही करणे शक्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बिअरबार पुन्हा होणार सुरू ; पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची माहिती मागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:36 PM
वाशिम : शासनाने गेल्या वर्षभरापासून परवाना नुतनीकरण नाकारून बंद केलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत.
ठळक मुद्दे राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत. परंतू त्यासाठी चार निकष घालून देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा परिषदेसह संबंधित इतर यंत्रणांकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे.